कांद्याचे दर ढासळल्याने शेतकरी हवालदिल

सातारा – कांद्याचे दर ढासळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येवू लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला दर येत नसल्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळू लागला आहे. कष्टाने पिकवलेला कांदा सडून जावू लागल्याने शेतकऱ्यांना फेकून द्यावे लागण्याची वेळ आली आहे.

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. परंतु, कांद्याची शास्त्रशुद्ध रितीने साठवणूक होत नसल्याने दर ढासळल्यानंतर शेतकरी अडचणीत येवू लागला आहे. थंडीच्या दिवसात कांद्याला मागणी असते व दरही चांगला मिळतो. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कांद्याने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. बाजारात अनुकूल परिस्थिती येईपर्यंत कांद्याची साठवणूक करणे आवश्‍यक आहे. या बाबीकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे खराब झालेला कांदा कवडीमोल दराने विकण्याची दर शेतकऱ्यांवर येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामीण भागात तर कांद्याचा वापर बहुतेक सर्व पदार्थात मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे कांद्याचे भाव कडाडल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळते. कांद्याला मागणी असली तरी अन्य पिकांच्या मानाने कांद्याची साठवणूक अधिक जोखमीची ठरते. त्यामुळे कांद्याच्या बाजारपेठेबद्दल व साठवणुकीबद्दल शेतकऱ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)