कांद्याची दर वाढ अल्पकालीन

नाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढत असून बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा तेजीत असल्याचे दिसून येतो आहे. त्याचा परिणाम म्हणून कांदा भाववाढ कायम असून लासलगाव येथे 15 हजार क्विंटल आवक झाली. कांद्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला.

मात्र, या भाववाढीमुळे कोणत्याही प्रकारे खुल्या बाजारपेठेत कांदा भाव वाढणार नाही, असे तज्ज्ञ सांगत असून सोशल मीडियावर फिरत असलेल्या कांदा दराच्याबाबत विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन बाजार समिती करत आहेत. या आठवडयाच्या सुरुवातीच्या लासलगाव येथे सोमवारी सरासरी 920 रुपये इतका होता. नंतर त्यात 100 रुपयांनी वाढ दिसून आली होती. त्यामुळे सध्या कांदा तेजीत असून त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, तरीही कारण नसताना काही वर्गाकडून ओरड झाली की, सरकार विनाकारण भाव पाडण्याचे प्रयत्न होतात. चाळीत साठवलेला कांदा विक्रीस आणला जात असल्याने थोडे पैसे मिळावे इतकी अपेक्षा शेतकरी वर्गाची असते. त्यामुळे दर वाढले तरी सरकारने हस्तक्षेप करू नये, अशीच अपेक्षा बळीराजा करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)