कांद्याची आवक वाढल्याने भाव गडगडले

  • चाकण बाजारभाव : 9 कोटी 15 लाखांची उलाढल

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात घट झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा भावात 900 रुपयांची घट झाली. कांद्याला प्रतिक्विंटल 2400 रुपये भाव मिळाला. बटाट्याची आवक घटून भाव उतरले. बाजारातील एकूण उलाढाल 9 कोटी 15 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 32320 क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक 13070 क्विंटलने वाढून भावात 900 रुपयांनी घट झाली. कांद्याचा कमाल भाव 3300 रूपयांवरून 2400 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1820 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 525 क्विंटलने घटली, बटाट्याचा कमाल भाव 700 रुपये प्रती क्विंटल झाला. भुईमूग शेंगाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव 6 हजार रुपयांवर स्थिर राहिला. लसणाची एकूण आवक 9 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 4 हजार रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 354 पोती झाली असून, हिरव्या मिरचीचा कमालभाव 4000 रुपये झाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा :
क्रमांक एक : 2400
क्रमांक दोन : 2000
क्रमांक तीन : 1800
एकूण आवक : 32320 क्विंटल
बटाटा :
क्रमांक एक : 700
क्रमांक दोन : 600
क्रमांक तीन : 500
एकूण आवक : 1820 क्विंटल
भुईमूग शेंग :
क्रमांक एक : 6000
क्रमांक दोन : 5000
क्रमांक तीन : 3000
एकूण आवक : 25 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 4000
क्रमांक दोन : 3500
क्रमांक तीन : 3000
एकूण आवक : 9 क्विंटल
फळभाज्या : प्रती 100 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)
हिरवी मिरची : 292 (3000 ते 4000), टोमॅटो : 938 पेट्या (300 ते 600), कोबी : 385 पोती (300 ते 500), फ्लॉवर : 418 पोती (300 ते 600), वांगी : 310 पोती (2000 ते 3000), भेंडी : 432 पोती (2500 ते 3500), दोडका : 163 पोती (3000 ते 4000), कारली : 218 डाग (3500 ते 4500), दुधीभोपळा : 185 पोती (500 ते 1000), काकडी : 294 पोती (300 ते 800), फरशी 80 पोती (2000 ते 3000), वालवड : 318 पोती (2000 ते 4000), गवार : 72 पोती (4500 ते 6500), ढोबळी मिरची : 269 डाग (2000 ते 3000), चवळी : 70 पोती (3000 ते 4000), वाटाणा : 810 पोती (1500 ते 2200), शेवगा : 70 डाग (4000 ते 5000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत) :
मेथी : एकूण आवक : 12381 जुड्या (300 ते 500), कोथिंबीर : एकूण आवक : 17495 जुड्या (300 ते 600), शेपू : एकूण आवक : 3210 जुड्या (30 ते 500), पालक : एकूण आवक : 5470 जुड्या (200 ते 400).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 110 जर्शी गायींपैकी 72 गाईची विक्री झाली (15 ते 60 हजार रुपये), 162 बैलांपैकी 78 बैलांची विक्री झाली (10 ते 30 हजार रुपये), 95 म्हशींपैकी 75 म्हशींची विक्री झाली (20 ते 60 हजार रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 9810 शेळ्या-मेंढ्यापैकी 9320 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 30 लाख रुपयांची उलाढाल झाली.

  • जनावरांचा बाजार रोहकल रस्त्यावरील जागेत स्थलांतरित
    कांद्याचा हंगाम सुरु झाल्याने दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढत असल्याने जागेअभावी चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मधील जनावरांचा बाजार तात्पुरता रोहकल रस्त्यावर समितीच्या आवारात स्थलांतरित करण्यात आला आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने कांदा ठेवण्यास मार्केटमध्ये जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे जनावरांच्या बाजारात कांदा ठेवायची व्यवस्था करून हा बाजार कांदा आवक कमी होईपर्यंत तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे. कांदा आवक कमी होताच जनावरांचा बाजार पुन्हा मार्केट यार्डात सुरु करण्यात येईल, असे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)