कांद्याची आवक घटल्याने भाव वधारले

चाकण- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड येथे कांद्याची आवक या 103 क्विंटल ने घसरली तर भाव 150 रुपयाने वधारले. तर या सप्तहात बटाटा आवक झाली2667 क्विंटलने घसरली तर भाव 1800 रुपये झाले . फळभाज्यांची आवक मंदावली हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, फरस बी,वालवर, वाटाणा, शेवगा या फळभाज्यांची आवक या आठवड्यात घटली तर भाव कमी जास्त प्रमाणत स्थिर झाले. लसूण आवक 05 क्विंटल झाली तर भावही 2 हजार रुपये झाले. भूईमुग शेंग आवक या 4 पोती झाली व भाव 5 हजार रुपयांवर स्थिर झाले. फळभाज्या आवक घटली. बाजारात एकूण उलाढाल 3 कोटी 15 लाख रुपये झाली.
महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 428 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1 हजार रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 2667 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेतही आवक 560 क्विंटलने घटली बटाट्याचा कमाल भाव 1800 रुपये झाला. चाकण फळभाज्या बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 418 पोती झाली.भाव 2000 रुपये स्थिर झाला.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 1 लाख 10 हजार जुड्यांची आवक होऊन 251 ते 1851 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 60 हजार जुड्यांची आवक होऊन 351 ते 1901 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 15 हजार जुड्या झाली. 301 ते 1051 असा जुड्यांना भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1000
क्रमांक दोन : 800
क्रमांक तीन : 400
एकूण आवक : 428 क्विंटल
बटाटा :
क्रमांक एक : 1800
क्रमांक दोन : 1400
क्रमांक तीन : 1000
एकूण आवक : 2667 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 2000
क्रमांक दोन : 1800
क्रमांक तीन : 1500
एकूण आवक : 5 क्विंटल
भुईमूग शेंग
क्रमांक एक : 5000
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 2500
एकूण आवक : 4 पोती
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयात)
टोमॅटो : 935 पेट्या (300 ते 600), कोबी : 364 पोती (200 ते 400), फ्लॉवर : 305 पोती (800 ते 1200), वांगी : 534 : पोती (1000 ते 2500), भेंडी : 318 पोती (1500 ते 2500), दोडका : 310 पोती (1000 ते 2000), कारली : 416 डाग (1000 ते 2000), दुधीभोपळा : 167 पोती (800 ते 1600), काकडी : 267 पोती (800 ते 1200), फरशी : 144 पोती (1000 ते 2000), वालवड : 3188 पोती (2000 ते 4000), गवार : 278 पोती (3000 ते 4500), ढोबळी मिरची : 561 डाग (700 ते 1000), चवळी : 145 पोती (1000 ते 2000), शेवगा : 104 डाग (3000 ते 4000 ).
पालेभाज्या : एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 9145 जुड्या ( 800 ते 1400), कोथिंबीर : एकूण आवक : एकूण 13245 जुड्या (800 ते 1200), शेपू : एकूण आवक : 4520 जुड्या (500 ते 800), पालक : एकूण आवक : 5316 जुड्या (300 ते 600).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात बैलपोळ्या निमित्त बैलांच्या संख्येत वाढ झाली. विक्रीसाठी आलेल्या 150 जर्शी गायींपैकी 110 गाईची विक्री झाली त्यांना 20 ते 50 हजार, 600 बैलांपैकी 425 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 45 हजार, 110 म्हशींपैकी 65 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 70 हजार, शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 6550 शेळ्या-मेंढ्यापैकी 6110 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 9 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 10 लाख रुपये उलाढाल झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)