कांद्याची आवक घटली, भाव मात्र स्थिर

चाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक 315 क्विंटलने घटली मात्र, भाव 800 रुपयांवर स्थिर राहिले. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 45 लाख रुपये झाली .
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 3100 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 800 रुपयांवर स्थिर झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1215 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 85 क्विंटलने घटली बटाट्याचा कमाल भाव 300 रुपयाने वाढून 1700 रुपये झाला. भुईमूग शेंगाची (जळगाव) एकूण आवक 04 क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव 700 रुपयाने वाढून 6 हजार रुपये झाला. लसणाची एकूण आवक 19 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 310 पोती झाली.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 6 लाख 80 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 1600 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 7 लाख 10 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 2750 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 45 हजार जुड्या झाली. 300 ते 1 हजार 111 असा जुड्यांना भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 800
क्रमांक दोन : 650
क्रमांक तीन : 500
एकूण आवक : 3100 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1700
क्रमांक दोन : 1400
क्रमांक तीन : 1300
एकूण आवक : 1215 क्विंटल
भुईमूग शेंग (जळगाव)
क्रमांक एक : 6000
क्रमांक दोन : 5500
क्रमांक तीन : 5000
एकूण आवक : 04 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 2000
क्रमांक तीन : 1500
एकूण आवक : 19 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 960 पेट्या (200 ते 500), कोबी : 295 पोती (200 ते 400), फ्लॉवर : 380 पोती (300 ते 600), वांगी : 450 पोती (500 ते 1000), भेंडी : 500 पोती (1000 ते 2000), दोडका : 335 पोती (1500 ते 2500), कारली : 340 डाग (1500 ते 2500), दुधीभोपळा : 190 पोती (500 ते 1000), काकडी : 215 पोती (500 ते 1000), फरशी : 75 पोती (2000 ते 3000), वालवड : 340 पोती (1500 ते 2500), गवार : 200 पोती (800 ते 1600), ढोबळी मिरची : 510 डाग (1000 ते 2000), चवळी : 100 पोती
(2000 ते 3000), शेवगा : 120 डाग (1000 ते 2000), गाजर :80 डाग (1000 ते 2000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 18590 जुड्या (500 ते 800), कोथिंबीर : एकूण आवक : 11240 जुड्या (1000 ते 1500), शेपू : एकूण आवक : 5640 जुड्या (400 ते 1000), पालक : एकूण आवक : 6290 जुड्या (300 ते 600).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 80 जर्शी गायींपैकी 32 गाईची विक्री झाली (10 ते 40 हजार रुपये), 140 बैलांपैकी 70 बैलांची विक्री झाली (15 ते 25 हजार रुपये), 125 म्हशींपैकी 90 म्हशींची विक्री झाली (20 ते 95 हजार रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 8970 शेळ्या-मेंढ्यापैकी 8560 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना (1200 ते 10 हजार) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 80 लाखांची उलाढाल झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)