कांदा लागवडीसाठी शेतकरी निरुत्साही

राजगुरुनगर- खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमणात कांदा पिकाची लागवड सुरु झाली आहे. मजुराची टंचाईबरोबर पावसाचा आणि विजेचा लपंडाव सुरू आल्याने शेतकरी वर्गात निरुत्साह आहे. त्यातच कांद्याचे बाजारभाव कांदा बाजारात येण्यापूर्वीच गडगडत असल्याने कांद्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी भीतभीत कांद्याची लावगड करीत आहे.
कांद्याला हमी भाव मिळावा म्हणून गेली अनेक वर्षे शेतकरी सरकारकडे मागणी व आंदोलने करीत आहेत. मात्र कांद्याला हमी भाव मिळत नाही. अकीलाडे अत्यल्प भाव तर दुसरीकडे कांदा पिक चांगले येईल की नाही याची शाश्‍वती नसल्याने शेतकरीवर्गात कायमच या पिकाबाबत संभ्रम पसरला आहे. कांदा पीक हे जास्त उत्पन्न देणारे शेतकऱ्यांचे एकमेव पीक आहे. त्यामुळे तालुक्‍यातील जवळपास 5 हजार हेक्‍टर क्षेत्रात कांद्याचे पीक रब्बी हंगामात घेतले जाते.
खेड तालुक्‍यात सर्वाधिक उत्पन्न देणारे कांदा पिक आहे. तालुक्‍यात चाकण आणि राजगुरुनगर या दोन ठिकाणी कांदा बाजार असल्याने शेतकरी या पिकला प्राधान्य देतात. तालुक्‍यात सुमारे 5 हजार हेक्‍टर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते. कांदा पिकाला पाण्याचे स्रोत असल्याने तालुक्‍याच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात हे पीक जास्त प्रमाणात घेण्यात येते.
अलीकडे पावसाचे अत्यल्प प्रमाण, अवेळी पडणारा वळवाचा आणि गारांचा पाऊस त्यातच रोगाचा प्रादुर्भाव खतांच्या आणि कांदा बियाणांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी प्रथमच त्रस्त असताना कांद्याला हमी भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

  • यंदा पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने कांद्याच्या रोपांवर परिणाम झाल्याने रोपांची टंचाई आहे. तर मजुरांची टंचाई खूप आहे. खेड तालुका कांद्याचे माहेरघर आहे. कांदा हे महत्त्वाचे पीक आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही आणि त्यातून उत्पन्न मिळत नाही सरकारने कांद्याला हमी भाव दिला पाहिजे. कांद्याला 15 रुपये प्रतिकिलो तरी बाजार भाव मिळाला पाहिजे तरच शेतकऱ्यांना कांदा शेती परवडेल.
    – बाळासाहेब सांडभोर, कांदा उत्पादक
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)