लाखणगांव- उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उन्हातान्हात कष्ट करून काढलेल्या कांद्याला दहा किलोस जेमतेम 60 ते 80 रूपये बाजारभाव मिळत आहे. या तालुक्‍यातील नद्यांवरील धरणांमुळे बारमाही शेती केली जाते. यावेळी इतर ठिकाणी असलेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे हमखास नगदी पिकांचे पैसे होतील. या भरवशावर तरकारी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली; परंतु सध्या तरकारी पिकाचे बाजारभाव घसरल्याने भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. कांदा, बीट, कोबी या पिकांना बाजारभाव नाही. टोमॅटो शेतकऱ्यांनी शेतात सोडून दिले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत आला असून कडक उन्हात जगवलेला शेतीमाल मातीमोल बाजार भावाने विकावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)