कांदा, बटाट्याचे भाव उतरले, लसूण स्थिर

चाकण-येथील महात्मा फुले मार्केट यार्डवर चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 492 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 900 रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 3300 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 830 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 2100 रुपये झाला. या सप्ताहात भूईमुग शेंगाची आवक 30 पोती झाली. लसणाची एकूण आवक 7 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव याही सप्ताहात 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 420 पोती झाली. भाव 2000 रुपये झाला.
चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केटयार्डवर कांद्याची आवक या सप्ताहात 283 क्विंटल ने घसरली तर भाव क्विंटलमागे 100 रुपयांनी उतरले. सणासुदीमुळे फळभाज्यांची आवक वाढली. हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, फरस बी, वालवर, वाटाणा, शेवगा या फळभाज्यांची आवक या सप्ताहात वाढली तर भाव कमी जास्त प्रमाणात उतरले. काहींचे स्थिर राहिले. लसूण आवक 7 क्विंटल झाली तर भावही 2500 रुपयांवर स्थिर झाले. भुईमूग शेंग आवक या सप्ताहात 30 पोती झाली व भाव वधारले. फळभाज्या आवक वाढली. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 35 लाख रुपये झाली.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 1 लाख 60 हजार जुड्यांची आवक होऊन 201 ते 1601 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 90 हजार जुड्यांची आवक होऊन 251 ते 1551 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 50000 हजार जुड्या झाली. 151 ते 751 असा जुड्यांना भाव मिळाला.

कांदा आवक – 492 क्विंटल
क्रमांक 1 : 900
क्रमांक 2 : 750
क्रमांक 3 : 500
बटाटा आवक – 3300 क्विंटल
क्रमांक 1 : 2100
क्रमांक 2 : 1700
क्रमांक 3 : 1100
लसूण आवक – 7 क्विंटल
क्रमांक 1 : 2500
क्रमांक 2 : 2000
क्रमांक 3 : 1800
भुईमूग शेंग आवक 30 पोती
क्रमांक 1 : 5500
क्रमांक 2 : 5200
क्रमांक 3 : 4500

फळभाज्या :-
टोमॅटो 1080 पेट्या (400 ते 800), कोबी 310 पोती (400 ते 600), फ्लॉवर 280 पोती (1000 ते 1600), वांगी 547 पोती (1500 ते 2500), भेंडी 470 पोती (1000 ते 2500), दोडका 220 पोती (2000 ते 3000), कारली 245 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा 215 पोती (700 ते 1500), काकडी 312 पोती (1000 ते 1600), फरशी 95 पोती (2000 ते 3000), वालवड 290 पोती (2500 ते 3500), गवार 140 पोती (3000 ते 4000), ढोबळी मिरची 612 डाग (1000 ते 2000), चवळी 92 पोती (1000 ते 2000), शेवगा 40 डाग (3000 ते 5000) रुपये.
पालेभाज्या :-
मेथी 13445 जुड्या (500 ते 1000), कोथिंबीर 15960 जुड्या (400 ते 800), शेपू – 4960 जुड्या (400 ते 600), पालक 3845 जुड्या (400 ते 700) रुपये.
जनावरे :-
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 130 जर्सी गाईंपैकी 70 गाईंची विक्री झाली. (10, 000 ते 40, 000 रुपये), 250 बैलांपैकी 175 बैलांची विक्री झाली. (10, 000 ते 35, 000 रुपये), 175 म्हशींपैकी 140 म्हशींची विक्री झाली. (20, 000 ते 80, 000 रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 7350 शेळ्या-मेंढ्यापैकी 26580 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना (1500 ते 7, 000 रुपये) इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 35 लाख रुपये उलाढाल झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)