कांदा, बटाट्याचे भाव उतरले

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. फळभाज्यांमध्ये वांगीव भेंडीची आवक वाढून भावदेखील वधारले. मिरचीची आवक घटून, भाव मात्र स्थिर राहिले. याशिवाय बटाट्याची आवक 44 क्विंटलने घटली आहे. कांद्याची आवक व भावदेखील घटले आहेत. याशिवाय कोथिंबीरीची आवक घटूनही भाव मात्र चढेच आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 771 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 17 हजार 110 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 123 क्विंटलने घटली आहेत; तर पालेभाज्यांची आवक तीन हजार 110 गडड्यांनी वाढली आहे.

बटाट्याची 65 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 44 क्विंटलची घट झाली आहे; तर भावात 200 रुपयांची घट झाली. कांद्याची आवक 63 क्विंटलने घटून भाव 450 रुपयांनी घसरले. भेंडीची आवक चार क्विंटलने वाढून भावात 1250 रुपयांची वाढ झाली. गवारीची आवक सात क्विंटलने घटून, भाव 1250 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची 29 क्विंटल आवक घटून, भाव मात्र 150 रुपयांनी वधारले. मटारची आवक दोन क्विंटलने घटूनही भाव 2000 रुपयांनी घटले. घेवड्याची आवक तीन क्विंटलने घटून भाव150 रुपयांनी घटले. दोडक्‍याची आवक पाच क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घटले. लसणाची आवक स्थिर राहून, भाव 100 रुपयांनी वधारले. आल्याची आवक दोन क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी घटले. मिरचीची आवक पाच क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुधी भोपळ्याची आवक स्थिर राहून, भाव 100 रुपयांनी वधारले. कारल्याची आवक चार क्विंटलने वाढून, भावमात्र. स्थिर राहिले. गाजराची आवक एक किंटलने वाढून, भाव मात्र 500 रुपयांनी वधारले. फ्लॉवरची आवक 49 क्विंटलने घटून भाव 50 रुपयांनी वाढला. कोबीची आवक 28 क्विंटलने वाढून भावात 100 रुपयांची घट झाली. वांग्याची आवक दोन क्विंटलने वाढूनही भाव मात्र 750 रुपयांनी वधारले. लिंबाची आवक तीन क्विंटलने घटूनही भावात 750 रुपयांची वाढ झाली. मका कणीसची 33 क्विंटल आवक घटून, भाव मात्र स्थिर राहिले. काकडीची आवक 13 क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले. सुरणची आवक एक क्विंटलने घटून, भाव स्थिर राहिले. भुईमुग शेंगांची दोन क्विंटल आवक होऊन, भाव 3750 रुपयांवर स्थिरावला. कैरीची एक क्विंटल आवक होऊन, भाव 500 रुपये राहिला.

शेवग्याची आवक सहा क्विंटलने घटून, भावात 750 रुपयांची घट झाली. ढोबळी मिरचीची आवक 13 क्विंटलने घटून, भाव 400 रुपयांनी घसरले. डांगरची आवक पाच क्विंटलने घटून, भावात 250 रुपयांची घट झाली. तोंडल्यांची आवक स्थिर राहून, भावात 450 रुपयांची घट झाली. बीटची दोन क्विंटल आवक घटून, भावात 300 रुपयांची घट झाली. पावट्याची एक क्विंटल आवक घटून, भाव 250 रुपयांनी वधारले. याशिवाय चवळीची आवक व भाव स्थिर राहिले. पापडीची आवक स्थिर राहून भाव 1250 रुपयांनी वधारले. वालवरची आवक स्थिर राहून, भाव 250 रुपयांनी घसरले. मका कणीसची आवक 33 क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सर्वाधिक सात हजार 700 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची तीन हजार 390 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची 530 गड्ड्या, मुळे 840 गड्ड्या, पुदीना एक हजार गडड्या, पालक दोन हजार 740 गड्ड्या, तर कांदापातीच्या एक हजार 140 गडड्‌यांची आवक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)