कांदा पीक तयार करण्यावर शेतकऱ्यांचा भर

बियाणांत फसवणूक होत असल्याने सुरक्षित उपाय

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरूळी परिसरात कांदा बियाण्यांचे पीक चांगलेच तरारले आहे. हे पीक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. बाजारातील कांदा बियाण्यांमुळे फसवणूक होण्याची शक्‍यता असल्याने शेतकरी कांद्याचे बीजोत्पादन स्वत:च करीत आहेत. घरगुती बियाण्यांपासुन चांगली व खात्रीशीर उत्पादन मिळणारी रोपे तयार होत असल्याचे या परिसरात शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यांचे तयार करण्यावर भर दिला आहे.
या बीजोत्पादनासाठी साधारत: नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत बुडखा कांद्याची लागवड शेतकरी करतात. बियाण्यांसाठी बुडखा कांदा साठवून ठेवला जातो, असा कांदा कापून गादी वाफ्यात त्याची लागवड केली जाते. याला शेतकरी ढेगंळा, असे म्हणतात. या ढेगंळ्याच्या शेंड्यांवर बीजाचे गोंड किंवा गोट फुलते. सध्या, कुरूळी, चिंबळी, मोई, निघोजे, केळगांव, मरकळ, सोळू, धानोरे परिसरात शेतामध्ये ढेगंळ्यावर मोठ मोठे गोंड फुल आलेले दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)