कांदा निर्यातीवरील अनुदान दुप्पट

नवी दिल्ली – कांदा निर्यातीवर देण्यात येणारे अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा निर्यातीवर देण्यात येणारी 5 टक्के सबसिडी वाढवून 10 टक्के करण्यात आली आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. निर्यात वाढल्यास कांद्याची उपलब्धता कमी होऊन भाव वाढू शकतील. त्यामुळे सबसिडी वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्चंडाईज एक्‍स्पोर्टस्‌ फ्रॉम इंडिया (एमईआयएस) या योजनेंतर्गत कांदा निर्यातीवर सध्या 5 टक्के सबसिडी देण्यात येते. या सबसिडीची मुदत 12 जानेवारी 2019 रोजी संपत आहे. सबसिडीची रक्कम 10 टक्के करून 30 जून 2019 पर्यंत ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)