कांदा, डाळिंब उत्पादक आर्थिक संकटात

नेत्यांची मात्र पाण्याच्या श्रेयाची लढाई

बिदाल, दि. 5 (वार्ताहर) – माण कांदा व डाळिंब उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहेत. मात्र, त्यांना दिलासा देण्याऐवजी तालुक्‍यात श्रेयवादाच्या लढाईत सर्वजण गुंतले आहेत.

माण तालुक्‍यामध्ये बिदाल, मलवडी, देवापूर, नरवणे, आंधळी, राणंद, पळशी, बिजवडी, टाकेवाडी, गोंदवले, शिखर-शिंगणापूर, कुकुडवाड आदी गावातील परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या, कांदाला पाचशे रुपये पेक्षा कमी तर डाळिंबाला 40 ते 120 दरम्यान दर मिळत आहे. माण तालुक्‍यात बाजारपेठ नसल्यामुळे आटपाडी, सांगोला, सांगली, कराड, लोंणद, विटा, कराड, फलटण बारामती या बाजारपेठेमध्ये कांदा जातो. माण तालुक्‍यातील राजकीय नेते पाण्याच्या लढाईवरून एकमेकांवर टीका करत करत आहेत.

शेतकऱ्यांच्या डाळिंब व कांद्याच्या दरावर काहीच बोलत नाहीत. मागील महिन्यात वाघमोडेवाडीत शेतकरी मेळावा झाला, मात्र, कांदाला व डाळिंबला दर कसा मिळेल, या विषयावर नेते काहीच बोलले नाहीत. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नेते गावोगावी फिरू लागले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना डाळिंब व कांदाला चांगले पैसे कसे मिळतील यावर बोलत नाहीत. सध्या कांदाला व डाळिंबला आतिशय दर कमी असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)