कांदा-टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या! – अजित पवार

अजित पवार यांची मागणी 

मुंबई – राज्यातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी आज अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने योग्य ते धोरण आखावे. आयात-निर्यातबाबत जर आवश्‍यकता भासली तर केंद्र सरकारशी बोलावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

अजित पवार यांनी स्थगनप्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.कांदयाला आज 400 ते 500 रूपये क्विंटल भाव मिळतो आहे. टोमॅटो उत्पादकालाही 20 किलोला 50 रूपये भाव मिळतो आहे. राज्य सरकारने हस्तक्षेप करून कांदा-टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दयावा. आयात-निर्यातीबाबत जर काही प्रश्न असेल तर तातडीने केंद्र सरकारशी चर्चा करावी अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)