कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

गतवर्षी शेतकऱ्यांनी काढलेला कांदा बाजारभाव नसल्याने साठवून ठेवला होता. त्यावेळी बाजारभाव वाढेल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, आजची परिस्थिती पाहता त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. सद्यस्थितीत नवीन कांद्याची आवक बाजारात सुरु झाल्याने जुन्या कांद्यास कुणी विचारतही नाही. जुना कांदा 10 ते 30 रुपये तर नवीन 40 ते 60 रुपये 10 किलो दराने विकला जात आहे. बाजारभाव घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कांद्याला फारशी तेजी आली नाही. शेतकऱ्यांना जेमतेम 100 ते 140 रुपये 10 किलोपर्यंत बाजारभाव मिळाला. बाजारभाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी जवळपास वर्ष ते दिड वर्ष कांदा बराकीत ठेवला. बराकीत कांदा ठेवल्याने कांद्याची सड सुरु झाली. सड निवडण्यासाठी मजुरीचा खर्च वाढला. कांदा साठवून ठेवल्याने कांद्याच्या वजनात घट झाली. एवढा खटाटोप करुनही कांद्याचे बाजारभाव वाढायला तयार नाहीत. बराकीत कांदा साठवून ठेवला; परंतु नवीन कांदा बाजारात यायला लागल्याने जुन्या कांद्यास कोणीही विचारण्यास तयार नाही. सरकारने कांदा निर्यातीकडे लक्ष देणे गरजेचे आहे किंवा नाफेडच्या वतीने हमीभाव देऊन कांदा खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. कांद्याचे रोप, औषध फवारणी, मजुरी इत्यादी खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारा बाजारभाव पाहिला तर कांद्याचे पिक तोट्याचे झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे अर्थकारण कोलमडले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)