कांदा अनुदानासाठी 19 हजार शेतकऱ्यांची नोंदणी

शेतकरी संघटनेकडून नगर तालुका बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक

नगर: कांदा अनुदान अर्ज भरण्यासाठी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नगर तालुक्‍यातील 19 हजार शेतकऱ्याचे अर्ज भरुन घेतले आहे. तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्याना अनुदान मिळण्यासाठी बाजार समितीने योग्य ते नियोजन केल्यामुळे शेतकरी संघटनेने संचालकांचे कौतुक केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यत ज्या शेतकऱ्यांनी मार्केटला कांदा दिला आहे, अशा शेतकऱ्यांना क्विंटलला दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला पाहिजे यासाठी बाजार समितीने अर्ज भरण्यासाठी 65 कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. अर्ज भरण्यापासून ते पूर्ण अर्ज जमा करण्यापर्यंत बाजार समितीचे कर्मचारी शेतकऱ्यांना मदत केली आहे. शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी गेली 25 दिवस राबत होते. बाहेर गावावरून येणाऱ्या शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समितीने राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था केली होती.

आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांचे अनुदान अर्ज भरते वेळी भेट देऊन पाहणी केली होती. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी काही अडचण येणार नाही, याबाबत सूचना केल्या होत्या. हे सर्व नियोजनाची दखल घेत चांगल्या कामाचे कौतुक झाले पाहिजे या उद्देशाने शेतकरी संघटनेचे विष्णु मोढवे यांनी बाजार सामितीच्या सर्व संचालकाचा सत्कार केला आहे. सभापती विलास शिंदे, हरीभाऊ कर्डिले, संदीप कर्डिले, दिलीप भालसिंग, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे, शिवाजी कार्ले, उद्धव कांबळे, जगन्नाथ मगर, बबनराव आव्हाड, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब जाधव, बहिरू कोतकर, वंसतराव सोनवणे, अभय भिसे या संचालकाचा सत्कार करण्यात आला.

शेतकरी संघटनेचे पद्माकर कोरडे, गुलाब मोढवे, रावसाहेब गाडेकर, संतोष तोडमल, रमेश चिताळ, जालिंदर यादव, नारायण पवार, देवीदास शिंदे, रामनाथ गवळी, दत्तात्रय गवळी, रामनाथ दळवी, अतुल रोहकले, ज्ञानदेव रोहकले, भरत जाधव, दत्तात्रय रोहकले, अशोक रोहकले, सुनील कोठुळे, रावसाहेब गाडेकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)