कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मंचर- शासनाने कांदा उत्पादकांना जाहीर केलेला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदानासाठी व्रिकी कालावधीत वाढ केली आहे. राज्य शासनाने 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान आपल्या कांद्याची विक्री करणाऱ्या उत्पादकांना 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केले आहे.
कांदा प्रस्ताव अनुदानासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या आवारामध्ये कांदा विक्री केलेली शेतकरी पट्टी, सातबारा उतारा, आधारकार्ड, बॅंक खाते नंबर इत्यादीसह कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या नावाने अर्ज सादर करावेत. तसेच एखाद्या प्रकरणात सातबारा उतारा वडीलांच्या नावे व कांदा विक्रीपट्टी मुलांच्या नावे किंवा कुंटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावे असेल तर सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे, अशा प्रकरणात वडील व मुलगा किंवा कुंटुंबातील अन्य व्यक्तींच्या सहमतीने बाजार समितीकडे शपथपत्र सादर केल्यानंतर सातबारा उतारा ज्यांच्या नावाने असेल त्यांच्या खात्यावरती सदरची अनुदान रक्‍कम सरकारकडून वर्ग करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी शासनस्तरावर झाल्यानंतर अनुदानाची रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅंक खात्यावर सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कांदा अनुदानाच्या अधिक माहितीसाठी बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती देवदत्त निकम यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)