कांदळी ग्रामस्थांकडून शाळेला सहा सीसीटीव्ही कॅमेरे

पिंपळवंडी-कांदळी (नगदवाडी) येथील डिजीटल जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात ग्रामस्थांच्या सहकार्यातून सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून जुन्नर तालुक्‍यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी ही पहिलीच शाळा असल्यामुळे या शाळेचे परिसरातून कौतुक होत आहे.
कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांनी येथील जिल्हा परीषद शाळेत सीसीटीव्ही बसविण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला ग्रामस्थांनी दुजोरा दिला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून शालेय आवारात सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य शरद लेंडे यांच्याहस्ते करण्यात आले. पंचायत समिती सदस्य शाम माळी, सरपंच सुजाता रेपाळे, उपसरपंच नारायण भोर, माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, गटशिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक बढे, वडगावचे माजी सरपंच माऊली निलख, यशवंत बढे, विठ्ठल कालेकर, मिनेश लेंडे, महेंद्र जगताप, मच्छिंद्र थोरात, गुलाब कुतळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन दत्ता हांडे, विद्या वाघ, स्वाती विश्वे, शुभांगी खेडकर, शारदा सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक एस. आर. शेंडकर यांनी केले. तर सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास बढे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)