कांचन

कांचन वृक्ष हा त्याच्या डौलदार पिवळ्या फुलांमुळे नजरेत भरतो. त्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. 
स्थुलपणावर – शरीराच्या स्थूलपणावर कांचन वृक्षाच्या खोडाच्या सालीचे चूर्ण पोटात घेतले असता स्थुलपणा कमी होतो. म्हणूनच कांचनवृक्षाच्या खोडाची साल ही आयुर्वेदाने स्थुलपणावर चरबी घटविणारी संजीवनी मानली जाते.
गंडमाळेवर उपयुक्‍त – हे गंडमाळेवरचे मोठे औषध आहे. गंडमाळा म्हणजे गळ्याच्या सभोवती माळेच्या आकाराच्या गाठी येतात.अशावेळी कांचनवृक्षाच्या खोडाच्या सालीचा काढा द्यावा, कांचनाची ही खोडाची साल 35 ग्रॅम चांगली ठेचून त्यांत 1/2 लिटर पाणी घालून ते मिश्रण एक अष्टमांश काढा इतपत उरवावे. मिश्रण मंद आचेवर ठेवावे. काढा तयार झाल्यावर तो गाळावा. त्यात 10 ग्रॅम मध घालून मग तो गंडमाळ झालेल्यांना द्यावा. याने शौचास साफ होऊन हळूहळू गाठींचा जोर कमी होतो. बरेच दिवस कांचनवृक्षाच्या सालीचा काढा पोटात घेतल्याने शरीरातील इतर कोणत्याही गाठी सुद्धा बऱ्या होतात.
अतिसारावर – कांचनाच्या सालीचा काढा दिल्याने अतिसार बरा होतो.
स्थूलत्व कमी करण्यासाठी – शरीराचा स्थूलपणा जाऊन सुटसुटीतपणा यण्यासाठी कांचन वृक्षाच्या सालीचा काढा नियमित द्यावा
रक्‍तशुद्धीसाठी – रक्‍तातील बिघाड नाहीसा करण्याचा या सालीचा गुण असल्यामुळे कांचन वृक्षाच्या सलीचा काढा घ्यावा. तो अत्यंत गुणकारी आहे.
त्वचा रोगावर – त्वचेचे रोग नाहीसे करण्यासाठी या काढ्याचा उपयोग होतो. पाळीच्या विकारात अतिरक्‍तस्त्रावावर आर्तव फार जाऊन थकवा येत असल्यास कांचनाच्या फुलांचा काढा करावा. 50 ग्रॅम फुले एक लिटर पाण्यात एक अष्टमांश उरवावी. हा काढा घेतल्याने मासिक पाळीचे विकार बरे होऊन आर्तव नियमित जाऊ लागते.
अशाप्रकारे कांचन वृक्षाची साल तसेच फुले यापासून बनवलेला काढा हा अत्यंत औषधी गुण असलेला आहे.अशाप्रकारे त्वचारोग, स्थुलपणा, पाळीचे विकार, गंडमाळ या विविध विकारांवर कांचन वृक्ष गुणकारी आहे. पण हल्ली दुर्मिळ होत चालला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)