कांगोतील हल्ल्यात भारतीय शांतीसैनिक जखमी 

संयुक्तराष्ट्रे – कांगो मध्ये संयुक्तराष्ट्रांच्या शांती सेनेत कार्यरत असलेला एक भारतीय जवान गेल्या शुक्रवारी तेथे झालेल्या हल्ल्यात जखमी झाला आहे. संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांच्या प्रवक्‍त्याने या घटनेची माहिती देताना सांगितले की गेल्या शुक्रवारी डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या काही गनिमांनी उत्तर किवू प्रांतात शांतीसेनेवर हल्ला चढवला.

त्यांनी तेथे अन्यत्र सामान्य नागरीकांवरहीं हल्ला केला. त्यांच्या हल्ल्यात एक भारतीय जवान जखमी झाला आहे. पण त्याच्या जखमा जीवावर बेतणाऱ्या नाहींत. जखमी झालेला जवान भारतीय सीमा सुरक्षा दलाचा आहे त्याची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर आहे असे तेथील रूग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तेथील शांती दलात एकूण 16000 सैनिक कार्यरत आहेत त्यातील 2606 जवान भारतीय आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)