काँग्रेस तोंडघशी ; पक्षाचे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन काढले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत मोबाईल अॅप ‘नमो’च्या माध्यमातून भारतीयांचा डेटा अमेरिकेतील कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र हा आरोप केल्यानंतर काँग्रेस पक्ष स्वतःच अडचणीत आला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अॅपमधून भारतीयांचा डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा आता फ्रान्सच्या हॅकरने केला. त्यामुळे काँग्रेस तोंडघशी पडली.

याच फ्रान्सच्या हॅकरच्या दाव्यावर काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. एलियट एल्डरसन या हॅकरने काल नमो अॅपमधून माहिती अमेरिकेत जात असल्याचा दावा केला. तर आज काँग्रेसच्या अॅपमधून डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा हॅकरने केला.

राहुल गांधी यांनी फ्रान्समधील हॅकर एलियट एल्डरसन याच्या ट्वीटच्या आधारवर बातमी शेअर केली. नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा दावा एलियट एल्डरसन या हॅकरने केला.

राहुल गांधींनी ज्या हॅकरच्या आधारावर नमो अॅपवर निशाणा साधला, त्याच हॅकरने आता काँग्रेस पक्षाचे अॅप असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या मोबाईल अपच्या माध्यमातून जेव्हा पक्षाच्या सदस्यतेसाठी अर्ज करता तेव्हा तुमची माहिती membership.inc.in ला जाते, असे हॅकरने म्हटले आहे. membership.inc.in चा आयपी अॅड्रेस 52.77.237.47. सिंगापूरमधील आहे. तुम्ही एक भारतीय राजकीय पक्ष आहात. त्यामुळे तुमचं सर्व्हर भारतात असणं अधिक योग्य आहे, असा उपरोधिक सल्लाही हॅकरने काँग्रेसला दिला.

हॅकरने भाजपला टीकेची आयती संधी दिल्यानंतर भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नमो अॅपवर आरोप करणाऱ्या काँग्रेसने स्वतःचेच अॅप प्ले स्टोअरवरुन डिलीट केले, अशी माहिती मालवीय यांनी दिली. विशेष म्हणजे नमो अॅप डिलीट करण्यासाठी राहुल गांधी स्वतः आवाहन करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)