काँग्रेस आवडते त्यांना राहुल गांधींसारखा पुत्र मिळो – अनुपम खेर

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नुकताच भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ते चर्चेचा विषय बनले होते. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे अनुपम खेर चर्चेत आले आहेत. अनुपम खेर यांनी आज एक मजेशीर ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘ज्यांना काँग्रेस आवडते देवाने त्यांना राहुल गांधींसारखा पुत्र द्यावा’, असे म्हंटले आहे.  त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

अनुपम खेर यांनी म्हंटले कि, निवडणुकीत आपापसातील संबंध खराब करू नयेत. ज्यांना भाजप आवडते देवाने त्यांना नरेंद्र मोदींसारखा पुत्र द्यावा. आणि ज्यांना काँग्रेस आवडते त्यांना राहुल गांधींसारखा, असे त्यांनी ट्विट केले आहे. यावर काहीजण त्यांच्या बाजूने मत व्यक्त करत आहेत तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

-Ads-

दरम्यान, ‘द अक्‍सिडेंटल प्राईम मिनीस्टर’ या चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर साकारणार आहेत. विजय गुट्टा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि हंसल मेहता यांनी लिहिलेला हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
30 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)