काँग्रेस आयटी सेल प्रमुख दिव्या स्पंदनांचे मोदींबाबत मानहानीकारक ‘ट्विट’; नेटिझन्सने झापले

काँग्रेस आयटी सेल प्रमुख दिव्या स्पंदना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एका टीकात्मक ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. जगातील सर्वाधिक उंच असलेल्या सरदार पटेलांच्या पायाजवळ उभे राहून पंतप्रधान पुतळ्याचे निरीक्षण करत असतानाच एक फोटो दिव्या स्पंदना यांनी ट्विट केला असून पंतप्रधान मोदींना उद्देशून अत्यंत खालच्या भाषेत “ती खाली पडलेली पक्षांची विष्ठा आहे का?” असे ट्विट केले आहे.

स्पंदना यांच्या या ट्विटमुळे त्यांच्यावर सोशलमीडियावर सडकून टीका करण्यात येत आहे. दरम्यान या ट्विटबाबत भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून या वादग्रस्त ट्विटवर टिप्पणी करण्यात आली, “काँग्रेसची मूल्ये घटत चालली असून, राहुल गांधी जो ‘प्रेमाच्या’ राजकारणाचा दावा करतात ते ‘राजकारण’ हेच का?” असा खोचक प्रश्न देखील भाजपाने ट्विटद्वारे विचारला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान काँग्रेसने स्पंदना यांच्या ‘या’ ट्विटसोबत पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे म्हंटले आहे. स्पंदना यांनी याआधी देखील पंतप्रधानांवर टीका करताना शाब्दिक मर्यादा न पाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)