काँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर

मुंबई – वंचित बहुनज विकास आघाडीची पहिली जाहीर सभा मुंबई येथे सुरू असून या सभेस भारिप बहुजन महासंघाचे  प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे बॅ.असदुद्दीन ओवैसी यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणामधून भटक्या विमुक्त जाती, आदिवासी समाज तसेच कोळी बांधवांच्या प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी मुबईतील कोळीवाडे, आग्रिवाडे तथा भंडारीवाडयांना शिवसेनेची साथ सोडून वंचित बहुजन विकास आघाडीसोबत यावे असे आव्हान केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार काय? यावर भाष्य करताना, वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय अजून देखील प्रलंबित राहण्यामागचे कारण हे ‘जागांसाठी’ नसून ते वैचारिक आघाडीवर एकमत होऊ न शकणे हे आहे. वंचित बहुजन आघाडीची प्रमुख मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणणे ही असून काँग्रेसकडून तसे आश्वासन मिळताच आघाडीचा निर्णय घेतला जाईल. असं त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)