काँग्रेसच्या ‘चार’ पिढयांनी दलितांना फसवले: अमित शहा 

संग्रहित छायाचित्र
जयपूर: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज राजस्थानच्या पाली जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसवर भरभरून तोंडसुख घेतले. या वेळी बोलताना शहा म्हणाले, “नेहरू-गांधी घराण्याच्या चार पिढयांनी देशावर राज्य केले, परंतु या कालावधीत दलितांचा विकास मात्र खुंटला. काँग्रेसने दलितांच्या दयनीय अवस्थेकडे कानाडोळा करत त्यांची फसवणूक केली आहे.”
“याउलट भाजपाने सत्तेत आल्यापासून दलित व गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. भाजपा मुद्रा योजना, अन्नपूर्णा रसोई योजना इत्यादी कल्याणकारी कार्यक्रम राबवत असून, सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत” असा दावा देखील त्यांनी केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)