काँग्रेसचा नाही तर, ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान – शरद पवार

मुंबई: काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही. ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. यावेळी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

एखाद्या संघटनेत काम करत असताना काही जण पडद्याच्या पुढे राहून काम करतअसतात तर काही जण पडद्याच्या मागे राहून काम करतात, पडद्याच्या मागे राहून काम करणाऱ्यांचे योगदान मोठे असते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून ज्यांनी पडद्यामागून योगदान दिले त्यात संजय खोडके यांचे नाव येते अशी स्तुती शरद पवार यांनी खोडके यांच्याबाबत बोलताना केली. तसेच भविष्यात अमरावतीत पक्ष वाढीसाठी खोडके यांचा नक्कीच उपयोग होईल अशी भावना व्यक्त केली.

शरद पवार पुढे म्हणाले, 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपाला पर्याय देईल. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला चिंता नाही.

काँग्रेसचे संजय खोडके यांचा खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश राष्ट्रवादी…

Δημοσιεύτηκε από Nationalist Congress Party – NCP στις Δευτέρα, 27 Αυγούστου 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
379 :thumbsup:
540 :heart:
7 :joy:
24 :heart_eyes:
16 :blush:
16 :cry:
8 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)