काँग्रेसकडे चेहराच नाही; त्यामुळे चॉकलेटी चेहरे समोर आणले, भाजप नेत्यांचे विवादित वक्तव्य

पटना –  काँग्रेसतर्फे प्रियंका गांधी-वढेरा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्यापासून भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये चोहीकडे प्रियंका गांधी यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. एकीकडे अनेक राजकीय जाणकारांनी प्रियंका यांचा सक्रिय राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश काँग्रेससाठी लाभदायक ठरणार असल्याचे भाकीत केले आहे. तर दुसरीकडे अनेकांनी प्रियंका यांचा राजकारणातील प्रवेशाने कोणताही फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, विनोद नारायण झा यांच्या विवादित वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. भाजप नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की, “काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे काँग्रेसकडून आता चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत. कधी सलमान खान काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याची अफवा पसरवली जाते, तर कधी करीना कपूर निवडणुक लढणार असल्याच्या चर्चा रंगतात. तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते.” असे विवादित वक्तव्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)