कहे कबीर : मिळेल कैसा हरि…   

अरुण गोखले 

लंबा मारग दुरि घर, बिकट पंथ बहु मार। 
कहौ संतो क्‍यूँ पाइए, 
दुर्लभ हरि दीदार।। 

-Ads-

लांब वाट अन दूर घर, 
अनेक येथे मारकरी। 
सांगा कैसा संत हो, 
मी जाईन प्रभूचे दारी।। 

भावार्थ- लोकहिताचा विचार करत, लोकांच्या मनातील एका प्रश्‍नालाच कबीरांनी ह्या दोह्यात शब्दबद्ध केलेले आहे. ते विचारतात की हे साधू ्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌संत आणि सज्जनांनो! मला त्या देवाच्या घरी जायचे आहे. तो ईश्‍वरच माझा मायबाप असून त्याचं घर हेच माझं सर्व सुखाच माहेर आहे. हे मला कळले आहे, पटले आहे. मी माझ्या आत्मकल्याणासाठी त्या घरी जायला हंवय. पण तिथे जाण्याचा मार्ग फार लांब आहे आणि माझं ते घर हे फार फार दूर आहे. बरं मी जरी त्या दूरच्या वाटेने प्रवास करायचा म्हटला तरी माझ्या मनातील काम क्रोध मद मोह आणि मत्सर हे षडरिपू त्या मार्गावर दबा धरून बसलेले आहेत. कधी माझ्या मनातील काम विकार हा मला त्या ईश्‍वर भेटीच्या मार्गापासून परावृत करतो. तर कधी क्रोध माझी प्रगतीची वाट अडवतो.

मद आणि मत्सर हे माझा मार्ग रोखून धरतात. लोभाची भुलवणी तर इतकी तीव्र आहे की ती माझ्या स्वार्थी मनाला लगेच भुरळ घालते. आणि मी ईश्‍वर साधनेच्या साध्यापासून परावृत होतो. हे षडरिपू त्या माझ्या मोक्षमार्गावरचे लुटेरू आहेत. ते घातक मारेकरी आहेत. त्यांना चुकवून त्यांच्या पासून माझी सुटका करुन घेत मी त्या ईश्‍वराच्या दारात कधी जाणार? तेव्हा हे मायबापहो! तुम्हीच आता माझ्यावर कृपावंत व्हा. या षडरिपूंना मारुन त्यांना विवेकाने दूर सारून, त्यांच्या वर संयमाने मात करीत त्या ईश्‍वर भेटीच्या मार्गावर मी कोणत्या साधनेने वाटचाल करायची ते तुम्ही मला सांगा. ते दुरावलेले, लांब असलेले घर मी कोणत्या मार्गांनी गाठू शकेन ते तुम्ही मला सांगा. तो मार्ग मला दाखवा. तुमच्या कृपेनेने मला खऱ्या ईश्‍वर साधनेने ते माझे दूरचे घर गाठू द्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)