#कहत कबीर: गुरू गुण कैसे लिखू…

अरूण गोखले

मूळ दोहा
सब धरती कागज करूँ,
लेखनी सब वनराज।
सात समुद्रकी मसि करूँ,
गुरू गुण लिखा न जाय ।।

मराठी अनुवाद
सर्व धरित्री कागद केली,
वृक्षांची केली लेखणी ती
शाई सात समुद्राची परि,
गुरूगुण लिहिले ना जाती।।

भावार्थ :तुम्हा आम्हा सर्वांना मांडलेला संसार प्रपंच हा नीट चालवायचा आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारा पैसा, धनसंपत्ती, मिळवण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या गुणांची, कला, ज्ञान ह्याची जे शिकवण देतात त्यांना आपण गुरू मानतो. अशा व्यावहारिक गुरूंची आपल्याला नितांत गरज असते. त्याबरोबरच हा प्रपंच्याचा खेळ खेळताना मानवी जीवनात येणारी, सुख दु:ख, यश अपशय, लाभ आणि हानि, मान अपमान.

त्याने ढासळणारे आपले मनोबल सावरण्यासाठी, असोनि संसारी आपल्याला मिळालेल्या या नरजन्माचे सार्थक साधण्यासाठी आपल्याला सदगुरूंचीही त्या गुरूं इतकीच किंवा त्यापेक्षा थोडी जादाच गरज असते. जेव्हा आपल्याला असे सदगुरू हे परमभाग्याने भेटतात, तेव्हा त्यांच्या कृपेने आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सार्थ होतात. अशा गुरूंच्या काय किंवा सदगुरूंच्या काय आपण सदैव ऋणात राहणे हेच योग्य होय. कारण काहीही केले तरी त्यांच्या उपकाराची आपण कशीच परत फेड करू शकत नाही.

संत कबीरांच्या लेखीसुद्धा मानवी जीवनातल्या ह्या दोन्ही गुरू आणि सदगुरूंना एक अनन्यसाधारण असे स्थान आहे. प्रपंच्यात आराम मिळवून देणारे व्यावहारिक गुरू आणि जीवाच्या जन्माचे कल्याण करविणारे सदगुरू त्यांना वंदनीय आहेत.

त्या गुरू आनि त्यांच्या महिमेबद्दल बोलताना कबीरदास असे म्हणतात की, सकल पृथ्वीचा जरी कागद बनविला, सर्व वृक्षांची लेखणी केली. सातही समुद्राच्या पाण्याची शाई बनविली तरी लिहायच म्हटले तर ह्या गुरूंचा अगाध महिमा हा लिहिता येणार नाही. कारण तो गुरूमहिमा हा अगम्य अतर्क्‍य आनि अवर्णनीय असाच आहे. त्यांचे मानव जातीवर अनंत उपकार आहेत. तेव्हा हा गुरूमहिमा कसा किती आणि कोणत्या शब्दांत वर्णन करायचा? गुरूंना आपल्याकडे माऊली असे म्हटले जाते आणि ते सार्थही आहे. कारण जसे आपल्याला मनुष्य जन्म देणाऱ्या त्या जननीचे गुण आणि तिचे उपकार हे न फेडता येण्यासारखे आहेत. त्याप्रमाणेच ह्या गुरूंचेही वर्णन करणे हे केवळ अशक्‍यच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)