कस्पटेवस्तीत स्मशानभूमी उभारणार

पिंपरी – कस्पटेवस्ती, वाकड येथे स्मशानभूमी उभारण्याबरोबरच तेथील स्थापत्य विषयक कामेही करण्यात येणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सुमारे 2 कोटी 51 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 26 कस्पटेवस्ती येथे स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्याठिकाणी काही स्थापत्य विषयक कामेही करण्यात येणार आहेत. या कामांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निविदा मागविण्यात आल्या होत्या. मूळ 2 कोटी 50 लाख 34 हजार 120 रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 2 कोटी 48 लाख 148 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार मेसर्स एस. बी. सवाई, मेसर्स सोहंम एंटरप्राईजेस आणि हिरेन कन्स्ट्रक्‍शन कंपनी या तीन ठेकेदार कंपन्यांनी निविदा सादर केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामध्ये एस. बी. सवाई यांनी मूळ निविदाच्या दरापेक्षा 20.09 टक्के दराने निविदा सादर केली. त्यांनी हे काम 1 कोटी 98 लाख 17 हजार 798 रुपये अधिक 1 लाख 95 हजार 672 रुपये रॉयल्टी आणि 38 हजार 300 रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण 2 कोटी 51 हजार 770 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 कस्पटेवस्ती, वाकड येथे बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी, तसेच तेथील स्थापत्य विषयक कामही करण्याचा ठेका मेसर्स एस. बी. सवाई यांना देण्यात येणार आहे. स्थायी समिती सभेत त्याला मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)