कस्तुरबांनी बापूंची महानता वाढवली – डॉ. गरूड

पिंपरी – मदत करून कस्तुरबांनी बापूंची महानता वाढवली. बापुंनी सुद्धा कस्तुरीला कस्तुरबा होण्यास मदत केली. महात्मा गांधी कस्तुरबाच्या जीवनाचा ध्रुवतारा होते, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप गरूड यांनी कस्तुरबांचे जीवन-चरित्र उभे केले.

साने गुरुजी कथा माला आणि मोरवाडी म्हाडा यांच्या विद्यमाने संस्कार वर्गात प्रमुख वक्‍ते डॉ. दिलीप गरूड यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनांचे विविध रंग उलगडले. ते पुढे म्हणाले, कस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 रोजी पोरबंदर जवळील काठीयावाड येथे झाला. वडिलांचे नाव गोकुळदास मेकनजी आणि आईचे नाव वज्रकुंवर. तीन भाऊ व दोन बहिणी मिळून पाच भावंडे. त्या काळात त्यांच्या गावात मुलांना कोणीच शिकवत नव्हते. शिक्षणाच्या बाबतीत गुजराथी समाज मागेच होता. कस्तुरबा शाळेत गेल्या नाही, यामुळे बालपणी निरक्षर राहिल्या. वैष्णव संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे त्या बालपणापासून सुशील व संयमी होत्या.

वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांचा विवाह झाला. कस्तुरबा या महात्मा गांधी यांच्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. कस्तुरबांनी महात्मा गांधीच्या धर्मपत्नी म्हणून आयुष्यभर एक अग्नीदिव्यच पार पाडले. पतीच्या जीवनाशी त्या एकरूप झाल्या होत्या. त्यांनी देशाचा संसार आपला संसार मानला. महात्मा गांधींच्या समाज सेवेला आणि स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी साथ दिली, असे गरूड यांनी सांगितले.

गोविंद पाटील यांनी मुलांचा सर्वांग सुंदर व्यायाम घेतला. बी. आर. माडगुळकर यांनी देह मंदिर ही प्रार्थना घेतली. पंडित भोसले यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास झिरपे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)