कसोटी सामन्याच्या पहिल्या अडीच तासांमध्ये अनेक विक्रम… 

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहारापूर्वीच भारतीय सलामीवीर शिखर धवनने 104 धावा करताना विक्रमी कामगिरी केली. तसेच भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला सर्वाधिक 87 कसोटी सामन्यानंतर संघात स्थान मिळाले. याआधी हा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर होता. त्याला 83 कसोटी सामन्यानंतर संघात स्थान मिळालं होतं. अफगाणिस्तानच्या संघाचा युवा गोलंदाज मुजीब-उर-रहमान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा व 21 व्या शतकात जन्मलेला पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर यामीन अहमदझाई अफगाणिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला. त्यानं शतकवीर शिखर धवनला बाद केलं. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे भारतात पहिल्यांदाच जून महिन्यात कसोटी सामना खेळविला जात आहे. आता फक्त मे आणि जुलै महिन्यात भारतात कसोटी सामना खेळवण्यात आलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)