कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी

लंडन: चौथ्या कसोटीसह पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-3 अशा फरकाने गमावणाऱ्या भारतीय संघाला उद्या (शुक्रवार) सुरू होत असलेली निर्णायक पाचवी कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखण्याची अखेरची संधी आहे.

ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव व हार्दिक पांड्या या गोलंदाजांनी आपले कौशल्य पणाला लावून भारताच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शर्माने अनेक विक्रमही मोडले. विक्रमांच्या बाबतीत बुमराह व पांड्याही मागे नाहीत. पण फलंदाजांच्या अपयशामुळे संघ पराभूत झाला आणि गोलंदाजांची कामगिरी झाकोळली.

मालिकेतील चार सामने झाले असून त्यात सहावेळा भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा संपूर्ण संघ माघारी धाडला. भारतीय गोलंदाजांना 1986 नंतर प्रथमच अशी कामगिरी करता आली आहे. त्यात हुकमी गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघात नसताना ही कामगिरी उल्लेखनीय म्हणावी लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)