कसोटी क्रिकेट: मयंक अग्रवाल, हनुमा विहारी सलामीला येण्याची शक्‍यता

स्थळ – मेलबर्न क्रीडा मैदान
वेळ – सकाळी 5 वाजता

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिका
  • लोकेश राहुल, मुरली विजयला वगळणार

मेलबर्न: पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये अपयशी ठरलेल्या मुरली विजय आणि लोकेश राहुलयांना भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर सलामीवीर म्हणुन संघात स्थानीक क्रिकेट सामन्यांमध्ये सातत्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या मयंक अग्रवालला संधी दिली जाणार असून त्याच्या साथीत हनुमा विहारी किंवा रोहित शर्मा सलामीला येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासुन भारतीय संघाला सतावत असलेली सलामीवीरांची चिंता सुटण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्थमधील दुसऱ्या कसोटीत 146 धावांनी दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीसाठी संघात अनेक बदल केले आहेत. मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मायांच्या सोबतच रविंद्र जडेजाचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, आर अश्विन अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे जडेजाला स्थान देण्यात आले. दुसऱ्या कसोटीतील टीका झाल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जडेजा तंदुरुस्त नसल्याचा दावा केला होता. मात्र, बीसीसीआयने त्यांचा हा दावा खोडून काढला आणि जडेजाला तंदुरुस्त घोषित करून संघात समाविष्ट करून घेतले आहे. त्यातच भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सूक असणाऱ्या हार्दिक पांड्याचा मात्र समावेश केला गेला नाही. त्यातच भुवनेश्‍वर कुमारला पुन्हा या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियानेही तिसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला असून त्यांनी संघात केवळ एक बदल करतना पीटर हॅण्ड्‌सकोम्बच्या जागी मिचेल मार्शला संधी दिली आहे. तर, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी जायबंदी झालेला सलामीवीर ऍरोन फिंच या कसोटीसाठी पुर्णपणे तंदुरूस्त असून तो याही कसोटीत सलामीला येणार असल्याची घोषणा टिम पेनने केली आहे.

तसेच सध्या ऑस्ट्रेलियन संघाचा फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज नॅथन लायनच्या गोलंदाजीचा तोड काढणे ही भारतीय संघा समोरील सर्वात मोठी चिंत आहे. असे वक्तव्य विराट कोहलीने केले आहे. नॅथन लॉयन हा उत्तम गोलंदाज आहे. तो सातत्याने एकाच टप्प्यावर मारा करण्यास सक्षम असून आमच्या संघातील फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर अधिकाधिक धावा करण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे आहे. कारण त्याला एका बाजूने सतत गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास तो अधिक घातक गोलंदाज ठरेल अशी भीती विराट कोहलीने व्यक्त केली.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया –
ऑस्ट्रेलिया – टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, ऍरोन फिंच, मिचेल मार्श, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, पिटर सिडल, मिचेल मार्श, ख्रीस ट्रीमेन, पिटर हॅण्ड्‌सकोम्ब.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)