कसोटी क्रमवारीत रबाडा पुन्हा अव्वल

दुबई: दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा याने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे ताकजत कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान काबीज केले आहे. श्रीलंका संघाविरुद्धच्या कोलंबो कसोटीमध्ये न खेळल्याचा फटका अँडरसनला बसला आहे .भारतीय संघाविरुद्धच्य लॉर्डस कसोटीमध्ये 43 धावा देत 9 बळी मिळवल्यानंतर अँडरसन पहिल्या स्थानी विराजमान झळा होता. तर रबाडा डिसेंबरमध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळणार असल्याने त्याचे स्थान अबाधित राहील.

न्यूझीलंड विरुद्ध दुसर्या कसोटीमध्ये 14 बळी मिळवण्याचा कारनामा करणारा पाकिस्तान संघाचा यासिर शाह याच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तो पुन्हा पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. तर फलंदाजी क्रमवारीत देखील बदल झाले आहेत. कोलंबो कसोटीमध्ये शतक ठोकणारा इंग्लंडच्या जॉनी बिअरस्टो याने सहा स्थानाची घेत 16 वे स्थान मिळवले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)