कश्‍यप ठरला “ऑस्ट्रिया’ चॅम्पियन

 विएना  – भारताचा अनुभवी बॅडमिंटनपडून पी. कश्‍यप याने शानदार प्रदर्शन करत ऑस्ट्रिया ओपन स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले. कॉमनवेल्थचा विजेता कश्‍यपने स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या जुन वी चिम यांचा पराभव करत विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केला.
शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित पी. कश्‍यपने एकतर्फी विजय मिळविला. जुन चिमचे आव्हान फक्त 37 मिनीटांत परतावून लावत 23-21, 21-14 असा त्याने सामना जिंकला. या विजयासह कश्‍यपचे हे तीन वर्षातील पहिले जेतेपद ठरले.
या स्पर्धेत प्रारंभीपासूनच 31 वर्षीय पी. कश्‍यप चांगल्या लयमध्ये दिसून आला आणि त्याने एकही सामना गमविला नाही. दरम्यान, अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये 126व्या क्रमांकावरील चीमने त्याला कडवी झुंज दिली. मात्र, कश्‍यपने तीन मॅच पॉईंट वाचवत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कश्‍यपने पुन्हा जोरदार प्रदर्शन करत ट्रॉफीवर नाव कोरल.
गतवर्षीचा यूएस ओपन ग्रॅण्ड प्रिक्‍सचा उपविजेता कश्‍यपने विजयानंतर ट्‌विट केले की, विएना येथील ऑस्ट्रिया ओपनचे विजेतेपद पुढील कामगिरीसाठी नक्‍कीच प्रोत्साहनपर ठरेल. यंदाचा वर्षातील माझे हे पहिले विजेतेपद आहे. मला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या शुभचिंतकांचे आभार मानतो, असे त्याने ट्‌विट केले. दरम्यान, कश्‍यपला काही काळापासून दुखापतीचा सामना करावा लागत असून यातून तो सावरत आहे.
समीर वर्मा अंतिम फेरीत 
जागतिक क्रमवारीत 41व्या क्रमांकावरील भारतीय युवा बॅडमिंटनपटू समीर वर्मा याने स्वीस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने उपान्त्य सामन्यात 19 वर्षीय कांताफोन वॅंगचारोनचा 21-14, 11-21, 21-12 असा तीन सेटमध्ये पराभव केला. समीर वर्माने सावध सुरूवात करत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये वॅंगचारोन याने दमदार पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. मात्र, तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये समीरने वर्चस्व राखत 21-12 असे आव्हान मोडित काढले. दरम्यान, उपान्त्यपूर्व सामन्यात त्याने जपानच्या केंटो मोमोटावर 21-17, 21-16 असा विजय मिळवित आगेकूच केली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)