कशी होती हॉकिंग यांची यंत्रप्रणाली? 

डॉ. दीपक शिकारपूर 

स्टीफन हॉकिंग आइन्स्टाइननंतरचे सर्वश्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ मानले जात. कुशाग्र बुद्धीच्या परंतु शारीरिक मर्यादांमध्ये जखडलेल्या व्यक्‍तीला संगणकीय तंत्राचे सहाय्य मिळण्याचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे थोर संशोधक स्टीफन हॉकिंग. त्यांच्या मेंदूतील विचारप्रक्रिया समजून घेणे आज आपल्याला शक्‍य झाले आहे ते निव्वळ संगणकीय उपकरणांमुळेच – अन्यथा हॉकिंग ह्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ इतरांना कधीच मिळू शकला नसता!! त्यांना (आणि उर्वरित जगालाही) सहाय्यक ठरलेल्या अनोख्या तंत्रप्रणालींचा थोडक्‍यात परिचय करून घेऊ. 

स्टीफन हॉकिंग ह्या द्रष्ट्या शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले. एमेरिट्‌स प्रोफेसर असलेले हॉकिंग हे न्यूटन, दिरा, बॅबेज अशांसारख्या शास्त्रज्ञांच्या बरोबरीचे गणले जातात. हॉकिंग बहुविकलांग असल्याने संगणकीय यंत्रणांखेरीज त्यांना आपले ज्ञान व्यक्तच करता आले नसते. त्यांना (आणि उर्वरित जगालाही) सहाय्यक ठरलेल्या ह्या तंत्रप्रणालींचा आपण थोडक्‍यात परिचय करून घेऊ. हॉकिंग बोलू शकत (म्हणजे त्यांचे विचार आपल्याला ऐकू येऊ शकतात) ते संगणकाधारित गुंतागुंतीच्या यंत्रणेद्वारे हे बहुतेकांना माहीत असेलच. ही प्रणाली त्यांना 1997 पासून इंटेल कॉर्पोरेशनने देऊ केली होती. ती चालवण्याचा, तिच्या देखभालीचा आणि ती अद्यावत करण्याचा सर्व खर्चही इंटेलच करीत आली होती. हिचे मूलभूत घटक म्हणजे टॅब, स्क्रीनवरचा सॉफ्टवेअर कीबोर्ड आणि हॉकिंग यांच्या चेहऱ्याच्या अगदी किरकोळ हालचालीही टिपणारा इन्फ्रारेड स्विच. ह्या – आणि इतरही आवश्‍यक त्या – वस्तू हॉकिंग ह्यांच्या व्हीलचेअरवर आणि त्यांच्या शरीरावरही विविध ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. चाकांच्या खुर्चीच्या हातावर टॅब बसवलेला होता. त्याला ऊर्जा मिळायची ती खुर्ची चालवणाऱ्या बॅटऱ्यांकडूनच. परंतु स्वतःच्या इंटर्नल बॅटरीवरही तो काही तास चालू शकतो. हॉकिंग यांनी संगणकीय यंत्रणेशी संवाद साधण्याचे मुख्य माध्यम उर्फ इंटरफेस होते ते वर्डस्‌ प्लस कंपनीने लिहिलेला प्रोग्रॅम – ईझी कीज्‌. ह्यामध्ये, वर सांगितल्याप्रमाणे, स्क्रीनवर दिसणारा सॉफ्टवेअर कीबोर्ड आहे. एक कर्सर ह्या स्क्रीनचे उभे-आडवे (कॉलम एँड रो) स्कॅनिंग सतत करीत असतो. हॉकिंग ह्यांना जे अक्षर निवडायचे असायचे त्यावर, त्यांनी स्वतःची मान किंचित हलवली की विशिष्ट संवेदकामार्फत, कर्सर थांबवला जायचा. ह्यासाठी त्यांच्या उजव्या गालाची हालचाल नोंदवली जात होती – त्यांच्या चष्म्याच्या काडीवर बसवलेल्या इन्फ्रारेड स्विचद्वारे… !! आहे की नाही संगणकीय अचूकतेची कमाल !!

ह्या ईझी कीजमध्ये वर्ड प्रेडिक्‍शन अल्गोरिदम समाविष्ट होते. म्हणजेच आपल्या हातातील सेलफोनमध्ये असलेली डिक्‍शनरी. त्यामुळे शब्दाची पहिली एक-दोन अक्षरे लिहिली की पुढच्या विविध शब्दांचे पर्याय दाखवले जात. पूर्ण वाक्‍य तयार करण्यासाठी स्पीच सिंथसायझर (विश्‍लेषक) ची मदत घेतली जात असे. हा वेगळा हार्डवेअर सिंथसायझर स्पीच प्लसने तयार केला होता. ईझी कीजद्वारे विंडोजच्या माउसचे नियंत्रणही हॉकिंग करू शकत असत. ह्यामुळे उर्वरित संपूर्ण संगणक चालवणे त्यांना शक्‍य होते – उदा. इमेल पाहणे, इंटरनेट सर्फिंग. फार काय स्वतःच्या भाषणाची तयारीही ते ह्यातून करू शकत – कीबोर्ड व नोटपॅड वापरून मजकूर लिहिणे आणि स्पीच सिंथसायझर आणि इक्वलायझर सॉफ्टवेअर वापरून, हळूहळू का होईना, त्याची आवाजी आवृत्ती तयार करणे शक्‍य होते. शिवाय लेक्‍चर प्रत्यक्ष सादर करण्यापूर्वी हॉकिंग त्यात सुधारणाही करू शकत. 2.7 गिगाहर्टझ्‌वर चालणारा इंटेल कोअर आय-सेव्हन प्रोसेसर आणि इंटेलचाच 520 मालिकेतील 150 जीबी सॉलिड स्टेट ड्राइव्ह (वेबकॅम आणि स्काइपसोबत) ह्या कामासाठी वापरले जात. ह्याखेरीज लेनोवो थिंकपॅड एक्‍स220 हा टॅब, स्पीचप्लस कंपनीने बनवलेले कॉलटेक्‍स्ट 5010 ह्या स्पीच सिंथसायझर्सचाही उपयोग केला जात असे. ह्यासाठीचा ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म होता विंडोज 7.

हॉकिंग ह्यांच्या गरजेनुसार ह्या अत्याधुनिक तंत्रातही सुधारणा करण्याचे काम इंटेल तसेच इतर संबंधित कंपन्यांद्वारे केले होते. विचार व्यक्त करण्यासाठी हॉकिंग ह्यांच्या चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल होते हे आपण वर वाचलेच आहे. त्या हालचालींचा अधिक कार्यक्षम रीतीने अर्थ लावणारी नवी सॉफ्टवेअर्स विकसित करण्यासाठी इंटेलने स्वतंत्र अभियंत्यांचीच नेमणूक केली होती. त्याचप्रमाणे, हॉकिंग ह्यांच्या शारीरिक हालचालींवर अवलंबून न राहता, ब्रेन-कंट्रोल्ड इंटरफेस द्वारे मेंदूतील विचारलहरींशी थेट संपर्क साधून त्यांचे मॅपिंग करण्याचेही प्रयत्न सुरू होते.

असे हे वेगळेच व्यक्तिमत्व लाभलेले स्टीफन हॉकिंग आइन्स्टाइननंतरचे सर्वश्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ मानले जातात. हॉकिंग अनेक संस्थांमध्ये विविध मानद पदे भूषवीत होते. केंब्रिज विद्यापीठातील उपयोजित गणित व सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभाग (ऊ-चढझ), सेंटर फॉर थिओरॅटिकल कॉस्मॉलॉजी (उढउ), कॉसमॉस नॅशनल कॉस्मॉलॉजी सुपरकॉंप्यूटर, एमेरिट्‌स ल्यूकॅशिअन प्रोफेसर ही अगदी टॉप फाइव्हपैकी म्हणता येतील अशी उदाहरणे. अपंगत्व – मग ते मानसिक असो की शारीरिक – कोण्याही सजीवाला लाक्षणिक अर्थानेही पांगळे करून टाकते, ह्यात शंकाच नाही. सध्याच्या जमान्यात मात्र त्यांना मदत करायला संगणकीय नवतंत्रज्ञान पुढे सरसावले आहे. कुशाग्र बुद्धीच्या परंतु शारीरिक मर्यादांमध्ये जखडलेल्या व्यक्तीला संगणकीय तंत्राचे सहाय्य मिळण्याचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे थोर संशोधक स्टीफन हॉकिंग. त्यांच्या मेंदूतील विचारप्रक्रिया समजून घेणे आज आपल्याला शक्‍य झाले आहे ते निव्वळ संगणकीय उपकरणांमुळेच – अन्यथा हॉकिंग ह्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ इतरांना कधीच मिळू शकला नसता!!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)