कवि मोरोपंत विद्यालयास द्वितीय क्रमांक

बारामती- शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त बारामती रेल्वे स्टेशन ग्राऊंडवर आयोजित केलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये कवि मोरोपंत विद्यालयाने सादर केलेल्या लेझिम प्रात्यक्षिकास द्वितीय क्रमांक मिळाला. यावेळी जिजामाता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्ये दैवत खंडेराया, म्हाळसा व बानाई यांचे सादरीकरण गाण्यावर लेझिमच्या माध्यमातून दर्शिवले. यास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन चैताली भोसले, पूजा कुंभार यांनी केले. त्याचप्रमाणे संध्याकाळी बारामती नगर परिषदमार्फत आयोजित शारदाप्रांगण बारामती येथे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये कवि मोरोपंत शिक्षण संस्था विद्या मंदिर या शाळेने सादर केलेल्या “मला जायचंय सौंदतीला’ या देवीच्या गाण्यास द्वितीय क्रमांक मिळाला. एकूण 24 गाण्यांमध्ये शाळेचा द्वितीय क्रमांक आला. या
स्पर्धेत बारामतीतील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांना ज्योती चव्हाण, कविता जांबळे यांनी मार्गदर्शन केले. या दोन्ही कार्यक्रमासाठी माया प्रभाळे यांनी प्रेरणा दिली. संस्थेचे अध्यक्ष सदाशिव सातव, संस्थेचे सचिव वर्षा मावळणकर व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)