कविता वैरागे यांच्या नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती

पुणे – प्रभाग 28 “अ’ या महर्षीनगर-सॅलिसबरी पार्कमधून अनुसूचित जाती प्रवर्गातून 2017 मध्ये महापालिका निवडणूक लढवून निवडून आलेल्या कविता वैरागे यांची जात पडताळणी वैद्यता प्रमाणपत्र उशीरा आल्याने नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

उस्मानाबाद जात पडताळणी समिती कार्यालयाकडून दोन दिवस जात वैधता प्रमाणपत्र उशीरा आल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्‍यात आले होते. उस्मानाबाद कार्यालयाने असलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीत प्रमाणपत्र पाठवणे आवश्‍यक होते. मात्र त्यांना दोन दिवस उशीर झाल्याने आणि मुदतीत सादर न केल्याने वैरागे यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते.

त्यानंतर वैरागे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळवली होती. मात्र नंतर ही स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर वैरागे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयावर 18 मे रोजी स्थगिती मिळवली आहे. मात्र ही स्थगिती तात्पुरती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)