कवडीपाट टोलनाक्‍यावर 29 लाखांचा गुटखा जप्त

  • गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई : परप्रांतीय चालक अटकेत

लोणी काळभोर – येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 29 लाख 66 हजार रूपयांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 12 लाख रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण साडे एक्‍केचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यावरील परप्रांतीय चालकास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8. 30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. यासंदर्भात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. पुणे- सोलापूर महामार्गावरून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथून एक टेम्पो गुटखा घेऊन जाणार आहे. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना कळवली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महेश ढवाण यांनी पोलीस हवालदार समीर चमनशेख, सचिन मोरे, परशुराम सांगळे, सागर कडु या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कवडीपाट टोलनाका येथे सापळा लावला. सकाळच्या सुमारास सोलापूर बाजुकडुन पुण्याकडे एक शेंदरी रंगाचे आयशर टेम्पो नंबर (टीएस 12- यूए 5572) आला. पोलीस पथकाने हा टेम्पो थांबवून, टेम्पोची तपासणी केली. त्यावेळी टेम्पोच्या मागील बाजूस 29 लाख 66 हजार रूपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा कंपनीचा गुटका मिळून आला. टेम्पोचालक शमीम अब्दुल वाहीद अहमद (वय 32, रा. कोकटपल्ली हबीबनगर, हैद्राबाद ) यास टेम्पो व मालासह ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता अन्न व औषध प्रशासनकडे ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण 29 लाख 66 हजार रूपये किमतीचा गुटखा व 12 लाख किमतीचा टेम्पो, असा एकूण 41 लाख 66 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. हा गुटखा हैदराबादवरुन मुंबईला नेण्यात येणार होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)