कवठे-विठ्ठलवाडी रस्त्याची दुर्दशा

कवठे :रस्त्यावर पडलेले मोठमोेठे खड्डे चालकांना त्रासदायक ठरत आहेत.

भुईंज, दि. 13 (वार्ताहर) – कवठे ते विठ्ठलवाडी रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. गेली पाच वर्षे या रस्त्याचे काम केले नाही. कवठे गावामधून विठ्ठलवाडी मार्गे हा रस्ता वाईला जातो. त्यामुळे हा रस्ता सतत गजबजलेला असतो.
शेतीमाल, दूध वाहतूक तसेच शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना जाणे-येणेसाठी हा रस्ता म्हणजे कवठेकरांसाठी महत्वाचा दुवा आहे. परंतु, याच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यातून रस्ता शोधताना अनेकांची परवड होते.
रस्ता खराब असल्यामुळे वाहनांची दुर्दशा तर होतेच शिवाय वाहनांमध्ये अनेकदा बिघाड होऊन वाहने बंद पडतात. दुचाकीवरून जाताना याच रस्त्यावर अनेक अपघात देखील झाले आहेत. पावसाळ्यात येथील नागरिकांना या रस्त्यामुळे प्रचंड हाल सोसावा लागतो. या रस्त्यावरील खडी बाहेर येऊन पडली आहे. आता ऊसतोडणी चालू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि होणारी हेळसांड टाळावी अशीच मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)