कवठे येथील आले पिक शेतीस बेल्जियमच्या शास्त्रज्ञांची भेट

कवठे ः आले पिक पाहणी करताना बेल्जियमची शास्त्रज्ञ व अतुल डेरे, राहुल डेरे, संदीप डेरे.

कवठे, दि. 24 (प्रतिनिधी)- कवठे (ता. वाई) येथील प्रगतशील युवा शेतकरी अतुल मधुकर डेरे हे प्रयोगशील असून ते आपल्या शेतीमध्ये नेहमी अत्याधुनिक व यशस्वी प्रयोग करीत असतात. त्यांनी केलेल्या या अत्याधुनिक प्रयोगामधून भरघोस व उच्च क्षमतेचे उत्पादन घेण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत. यंदा त्यांनी आधुनिक पद्धतीने नेटाफिम कंपनीच्या नेटबिट’इस्रायलच्या तंत्रज्ञाने ठिबक पद्धतीने आले लागवड केली आहे. त्यांचे आल्याचे पिक अतिशय जोमात असून राज्यातील विविध भागातील शेतकरी त्यांचे हे पिक पाहण्यासाठी व त्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी डेरे यांच्या शेतीस भेट देत असतात. कवठे गावासारख्या ग्रामीण भागात केलेल्या त्यांच्या या शेतीतील प्रयोगांची दखल परराज्यातील शेतकरी सुद्धा घेत असून परराज्यातील शेतकरी सुद्धा त्यांच्या या शेतीस भेट देत आहेत. नुकत्याच त्यांच्या या शेतीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून बेल्जियमचे शास्त्रज्ञडेव्ह पिंक्‍सटरिन यांनी भेट दिली देऊन अतुल डेरे यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक केले. डेव्ह पिंक्‍सटरिन यांनी “नेटबिट’ द फर्स्ट इरिगेशन सिस्टिम विथ ब्रेन या ठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली तसेच आले पिकाच्या उत्पादन वाढीवर सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रगतशील शेतकरी राहुल डेरे, उपसरपंच संदीपडेरे,वाई बाजार समिती संचालक दत्तात्रय पोळ, तात्याबा डेरे सुनील डेरे, बापुराव ससाणे,संजय डेरे ,विक्रम पोळ आदी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)