कवठे परिसरातील शाळांच्यामध्ये शिक्षक दिन उत्साहात

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व विन्सटेक कॉम्प्युटर्स यांचा संयुक्त उपक्रम
कवठ – ता. वाई येथील परिसरामध्ये असलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. श्री शिवाजी सुरूर येथील विद्यार्थी व विन्सटेक कॉम्प्युटर्स कवठे यांनी शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्याबद्दलची मनोगते व्यक्त केली व विन्सटेक कॉम्प्युटर्सद्वारा सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र व पुष्प देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांनी व विन्सटेक कवठे यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचा सत्कार केल्याने आम्हाला खूप आनंद झाला. शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी कष्ट घेत असतो. ज्यावेळी विद्यार्थी यशाचे शिखर गाठतात. त्यावेळी तो त्या शिक्षकासाठी व त्याच्या शाळेसाठी बहुमान असतो. यावेळी विन्सटेक कॉम्प्युटर्सचे संचालक विनोद पोळ म्हणाले एम. के. सी. एल. तर्फे सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मानित करण्यात येत असून ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

संगणक शिक्षकांच्या हातून आज जिल्ह्यात सर्वत्र शालेय शिक्षकांचा सत्कार होत असून त्यांनी केलेल्या ज्ञानदानाची ही छोटी पोचपावती आहे. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमातून शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते आणखी दृढ होत असून आजकाल शिक्षकांच्या प्रती आदरभावना वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे.

दरम्यान, कवठे येथील क्रांतिवीर किसन वीर माध्यमिक विद्यालय कवठे, प्राथमिक शाळा कवठे, प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, रामराव पाटील माध्यमिक विद्यालय बोपेगाव, श्री शिवाजी इंगिल्श मिडीयम स्कूल सुरूर, कला वाणिज्य महाविद्यालय सुरूर तसेच वेळे हायस्कूल, केंजळ हायस्कूल केंजळ येथे सुद्धा शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शाळांच्यामधून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवठे शाळेच्या मुख्याध्यापिका सावंत, क्रांतिवीर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा माने, विठ्ठलवाडी मुख्याध्यापक जाधव, प्रताप डेरे, सुरूर हायस्कूलचे शिक्षक अविनाश चव्हाण, महेश टिळेकर, ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष शशिकांत करपे, मानसिंग चव्हाण, रितेश डेरे, गणेश गायकवाड, किरण चव्हाण, कवठे गावच्या पोलीस पाटील वर्षा ससाणे, सर्व शाळांचा शिक्षक वृंद, ग्रामस्थ यांनी नियोजन केले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)