कवठे जिल्हा बॅंकेचे कृषी विकासाचे पायाभूत काम – मेरव मॅटेजिसियन

कवठे : कृषी विकासासाठी इस्त्राईलने प्रतिकूल भौगोलिक व नैसर्गिक परीस्थितीवर मात करून उपलब्ध पाणी व्यवस्थापनातून शेतीचा विकास केला आहे. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील कृषी विकासाचे पायाभूत काम जिल्हा बॅंक करत आहे. या कृषी क्रांतीचे संपूर्ण श्रेय जिल्हा बॅंकेचे संचालक, व्यवस्थापन व शेतकरी सभासदांचे आहे. असे गौरवोद्‌गार नेटाफिम इरिगेशन कंपनीच्या संचालिका मेरव मॅटजिसियन यांनी काढले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व नेटाफिम यांच्यावतीने शेतकरी उस पीक परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे,संचालक आदी उपस्थित होते.
भविष्यात पाणी तसेच अन्नधान्याचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे शेतीमध्ये ड्रिप इरिगेशनचा वापर करावा असे आवाहन मेरव यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळीअरुण देशमुख ,संजीव माने, बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल माने , संचालक प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

यावेळी बॅंकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मान्यवरांचा तसेच ठिबक सिंचन प्रणाली बसवून ती उत्तम प्रकारे कार्यरत ठेवणारे शेतकरी बॅंकेचे संचालक नितीन पाटील, अतुल डेरे , गुलाबराव भिलारे यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत सरव्यवस्थापक संजय जाधव, मधुकर जाधव यांनी तर सूत्रसंचालन सुजित शेख यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)