कवठेत भैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात साजरा

कवठे – कवठे, ता. वाई येथे भैरवनाथ जन्मोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्‍वर पारायण सोहळा नुकताच पार पडला. भैरवनाथ जन्मोत्सवाचे औचित्य साधून आठवडाभर प्रतिवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा कवठे येथे साजरा केला जातो. यामध्ये आठवडाभर विविध कीर्तनकार, प्रवचनकार व भारूडांचा भरगच्च कार्यक्रम साजरा केला गेला.

प्रतिवर्षी भैरवनाथ जन्मोत्सवाच्या दिवशी भैरवनाथाची पालखी मिरवणूक व गावप्रदक्षिणा करण्यात आली. या ग्रामप्रदक्षिणेदरम्यान स्त्री व परुष भेदभाव विसरून गोल रिंगण व फुगड्या खेळत होते. ढोल-ताशांच्या गजरात व अखंड विठ्ठलनाम जयघोषात ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. तद्नंतर काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेतला गेला. यंदाच्या काल्याच्या कीर्तनाचा मान ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांना देण्यात आला होता.

ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था झिरपवाडी, ता. फलटण येथील विद्यार्थी व ह.भ.प. विजय महाराज जाधव हे यंदाचे व्यासपीठ चालक होते. आठवडाभर सुरू असलेल्या कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद भोजनाने करण्यात आली. महाप्रसाद भोजन ओझर्डेकर कुटुंबीयांच्याच्यातर्फे देण्यात आले होते. प्रत्येक कीर्तन व प्रवचन कार्यक्रम हे निवडक ग्रामस्थांनी प्रायोजित केले होते.

दरम्यान, पारायण सोहळ्यातून हल्लीच्या युगातील समस्या व त्यावर करावयाच्या उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न होत आहे. प्रवचनातून कौटुंबिक समाजप्रबोधन ही काळाची गरज आहे. व्यसनाधीन होत असलेल्या तरुण पिढीसाठी या प्रकारचे सोहळे म्हणजे आपल्या जबाबदारींची जाणीव करून देणारे अंजनच असल्याचे प्रतिपादन पारायण सोहळा मार्गदर्शक संजय डेरे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)