कवठेत आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे उद्‌घाटन

कवठे, दि. 25 (प्रतिनिधी) – आमदार मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कवठे (ता. वाई) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कवठे येथील गोकुळ तालमीच्या नूतन इमारतीचे उदघाटन, जिम साहित्याचे पूजन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे.
आमदार मकरंद पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कवठे ग्रामस्थांच्यावतीने येथील शिवाजी चौकात रविवारी, दि. 28 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते वरील उद्घाटनाव्यतिरिक्त आशियाई महामार्ग ते विठ्ठलवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन, कवठे स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन व त्यालगत असलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन, ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याच्या जुन्या विहिरीलगत साकव पूल, विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमी, मुकाईमंदिर सभामंडप, मेसुबाई मंदिर पेव्हर ब्लॉक व विठ्ठलवाडी साकव व बंधारा इत्यादी कामांची पाहणी व भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, गोरख सरक, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, आबा सूळ, महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र पवार, शाहू केसरी सतिश भिलारे, जागतिक विजेता विलास देशमुख, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सुरेश वीर, ज्येष्ठ नेते सर्जेराव जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, मनोज पवार, सभापती रजनीताई भोसले, उपसभापती अनिल जगताप, संचालक दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव पिसाळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, जिल्हा परिषद सदस्या संगिता मस्कर, मधुकर भोसले, दिपक बाबर, नारायण जाधव, कांतीलाल पवार, दिलीप पिसाळ, प्रमोद शिंदे, उदयसिंह पिसाळ, विजयसिंह नायकवडी, महादेव मस्कर, शशिकांत पवार, दिलीप बाबर, शंकर शिंदे, मदन भोसले, रमेश गायकवाड, रविंद्र जाधव, उमा बुलुंगे, विक्रमसिंह पिसाळ, प्रकाश पावशे, महेश डोंगरे, कुमार जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे अवाहन कवठे ग्रामस्थांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)