कवठेकरांनी जपल्या शहीद अंबादास पवार यांच्या स्मृती

श्री शिवाजी विद्यालय सुरूर येथील शिलालेखाचे उद्घाटन करताना कवठे सरपंच श्रीकांत वीर व मान्यवर (छाया : करुणा पोळ, कवठे.)

श्री शिवाजी विद्यालयात शिलालेखाची उभारणी, ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम
कवठे, दि. 26 (प्रतिनिधी) मुंबई येथे 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कवठे येथील अंबादास पवार हे हुतात्मा झाले होते. या घटनेला आज 10 वर्षे पूर्ण झाली. कवठे ग्रामस्थांनी श्री शिवाजी विद्यालय येथे शीलालेखाची उभारणी करुन हुतात्मा अंबादास पवार यांच्या स्मृती अनंत काळासाठी जपल्या आहेत.
प्रतीवर्षी कवठे ग्रामस्थांच्यावतीने 26 नोव्हेंबर हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन केले जाते. मात्र, यंदाचा हा शहीद दिन कवठे ग्रामस्थांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यामध्ये कवठे येथील ग्रामस्थांनी श्री शिवाजी विद्यालय सुरूर येथे शहीद अंबादास पवार यांच्या कार्यकर्तुत्वाची माहिती देणारा सुवर्ण अक्षरातील शिलालेख उभा केला. तसेच कवठे येथील प्राथमिक शाळेतील कवठे गावातील सर्व शहिदांची माहिती असलेल्या शिलालेखाचे व शहीद अंबादास पवार यांच्या प्रतिमेचे पूजन या निमित्ताने कवठे ग्रामस्थांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवठे गावचे सरपंच श्रीकांत वीर व माधवराव डेरे उपस्थित होते. किसनवीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ, उपसरपंच संदीप डेरे, केशव पिसाळ, मारुती पोळ, जयवंत पोळ, आनाद्रव डेरे, नितीन करपे, गिरीश पोळ, हणमंत डेरे, हेमंत मोरे व विनोद पोळ, शशिकांत करपे, सुधाकर डेरे, सुनील पवार, मुख्याध्यापक प्रकाश थोरात, प्रकाश सोनावणे तसेच शिक्षक वर्ग व कवठे ग्रामस्थ उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)