कळस- कळस गावामध्ये व रस्त्यालागत असलेल्या ढाब्यांवर अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात असून अनेक ढाब्याच्या परिसरात देशी-विदेशी दारूच्या बाटल्याचा खच पडलेला असतो. त्यामुळे कळसमधील दारुबंदी नावालाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात नवीन-नवीन युक्‍त्या, शक्कल लढवून दारूची चोरटी वाहतूक करून विक्री केली जात आहे. पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने “दारूबंदी नावाला विक्री साऱ्या गावाला’चे चित्र परिसरातील ग्रामीण भागातही दिसून येत आहे. ढाबा, रेस्टॉरंटच्या नावाखाली चोरून लपून दारूची विक्री सुरू आहे. गावबाहेरील ढाब्यावर अचानक गेल्यास प्रत्येक टेबलवर दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत. हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असताना संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याचबरोबर सरकार मान्य नीरा विक्री केंद्रावर हप्ते देऊन जोमात ताडी विक्री देऊन सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातही दारूचे बॉक्‍स माफियामार्फत पुरविले जात आहेत. यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचा सरार्स वापर होत असून थेट गावातच दारू पोहोचत असल्याने ग्रामीण भागात ही दारूमाफियाने पाय रोवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)