कळवाडी वस्तीवरील रस्त्याचे भूमिपूजन

वडगाव मावळ – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मळवंडीतील कळवाडी वस्तीवरील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंचांच्या हस्ते करण्यात आले .

कळवाडी वस्तीवरील लोकांना ये जा करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना दैनंदिन जीवन जगताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील सर्वच कुटुंबे शेतकरी असल्याने व रस्ता नसल्याने शेतात पिकविलेला शेतमाल त्यांना डोक्‍यावरून वाहून गावातील रस्त्यापर्यंत आणावा लागतो. या वस्तीवर जाण्यासाठी चांगली पायवाट ही नसल्याने डोक्‍यावरून शेतमाल वाहताना अनेक छोटे मोठे अपघात होतात. तसेच वस्तीवरील लहान शाळकरी मुलांना पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागत.

-Ads-

वस्तीवर रस्ता नसल्याने आजारी व्यक्ती व वृद्धांना दवाखान्यात नेताना किंवा एखाद्या व्यक्ती दगावल्यास त्याची अंतयात्रा ही काढता येत नाही, इतकी बिकट परिस्थिती स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर याठिकाणी अनुभवयाला मिळते. रस्त्यासारखी मुलभूत सुविधा देखील येथील ग्रामीणांना अद्याप मिळाली नव्हती. परंतु आता येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच रस्ता तयार होईल, या कल्पनेने ग्रामस्थ आनंदित आहेत.

या वस्तीवरील लोकांची समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि .19) रोजी झालेल्या ग्रामसभेत रस्ता करणेबाबत ठराव घेण्यात आला व या ठरावास सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने सहमती दर्शविली. तसेच या रस्त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद 14 व्या वित्त आयोगातून आपला गाव आपला विकास या अंतर्गत मिळणाऱ्या निधीतून करण्यात आली आहे.

या रस्त्याचे भूमिपूजन सरपंच रंजना बाळू ढोरे, उपसरपंच सुवर्णा सुनील ढोरे यांनी नारळ फोडून केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू वसंत ढोरे , शंकर ढोरे, गोरख ढोरे, पोपट ढोरे, वामन ढोरे, एकनाथ ढोरे, नवनाथ ढोरे, भाऊ ढोरे, कैलास ढोरे, सीताराम ढोरे, वामन ढोरे, नवनाथ शिंदे, काळुराम ढोरे, बाळू ढोरे, अशोक ढोरे, मारुती ढोरे, शरद जाधव, निलेश ढोरे व सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)