कळमोडी @ 100

राजगुरुनगर- खेड तालुक्‍यातील तिसरे धरण म्हणून नावलौकिक असलेले कळमोडी धरण बुधवारी (दि. 13) सकाळी 100 टक्के भरले असून पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के भरणारे कळमोडी हे पहिले धरण आहे.
खेड तालुक्‍यातील कळमोडी धररण परिसरात गेली आठ दिवस पडत असलेल्या पावसामुळे आरळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढला. त्यामुळे बुधवारी कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. 1 .51 टीएमसी पाणी साठा या धरणात आहे. धरण भरल्याने त्यावरून सुमारे दीड ते दोन हजार क्‍युसेस वेगाने पाणी खाली कोसळत असल्याने आरळा नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नदीचे पाणी खाली चास कमान धरणात जमा होत असल्याने चास कमान धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
खेड तालुक्‍यातील खरपूड, भोमाळे, कुडे, घोटवडी, धामणगाव खुर्द, आंबेवाडी (मोरोशी) या डोंगर परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आरळा नदीला पूराचे स्वरूप आले आहे. कळमोडी धरण परिसरात आतापर्यंत सुमारे 500 मिलीमीटर पावसाची नोद झाली आहे. 2015मध्ये 25 जुलै रोजी धरण भरले होते. 2016 माध्य 11 जुलै रोजी धरण भरले होते. 2017 मध्ये 4 जुलै रोजी धरण भरले होते. यावर्षी 2018 रोजी 12 जुलै रोजी धरण भरले आहे.
खेड तालुक्‍यातील कळमोडी धरण हे तिसरे धरण म्हणून नावारूपाला आले आहे, खेड आणि आंबेगाव तालुक्‍यासाठी या धरणातील पाण्याचा उपयोग होत आहे. या धरणाची उंची 38 मीटर इतकी असून लांबी 295 मीटर इतकी आहे. या धरणात 33. 75 दलघमी पाणी साठा होतो. धरणात 1.51 टीएमसी इतका पाणी साठा असलेले खेड तालुक्‍यातील हे तिसरे धरण आहे. या धरणासाठी 112 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली होती. 2000मध्ये धरणाचे काम सुरू झाले. जून 2010 धरण पूर्ण होऊन धरणात पाणी साठा केला जात आहे.
या धरणाची निर्मिती अतिशय निसर्गरम्यपरिसरात झाल्याने शहरी पर्यटक वर्षाविहार करण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. या धरणावर शहरातील मोठ्या संख्येने दरवर्षी पर्यटक येत असतात. पर्यटन केंद्र म्हणून या परिसराचा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. मात्र त्यावर अजूनही कारवाई नाही हा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहे.

 • धरणातील पाणीसाठा व पावसाची आकडेवारी
  एकूण पाणी पातळी 682.70 दशलक्ष घनमीटर
  एकूण साठा 33.75 दशलक्ष घनमीटर
  उपयुक्त पाणीसाठा 32.16 दशलक्ष घनमीटर
  टक्केवारी 100 टक्के
  धरणातील पाणी क्षमता 1.51 टीएमसी
  आजपर्यंत धरण क्षेत्रातील पाऊस 487 मिलिमीटर
  कळमोडी (ता. खेड) : धरण बुधवारी 100 टक्के भरले. (छायाचित्र : रामचंद्र सोनवणे)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)