कळंब, रांजणी परिसरात विहिरी तुडुंब

दमदार पावसाने पाणी पातळी वाढली ः बळीराजा सुखावला
मंचर  -पावसाने कळंब, महाळुंगे, चांडोली, रांजणी (ता. आंबेगाव) परिसरात विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. विहिरी, कुपनलिकांना भरपूर प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
मंचर, अवसरी, रांजणी, चांडोली, घोडेगाव, डिंभा, कळंब तसेच इतर गावांनी संततधार पावसामुळे ओढ्यानाल्यांना पाणी वाहू लागले आहे. त्याचा फायदा विहीरींची पाणीपातळी वाढण्यासाठी झाल्याचे दिसून येते. दरवर्षी जानेवारीनंतर बहुतांशी गावात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. सद्यस्थितीत झालेला पाऊस आणि अजून होणारा पाऊस यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येते. कळंब परिसरातील भैरवनाथमळा, माळीमळा, शिलमळा, दगडीमळा या परिसरातील विहीरी बहुतेक काठोकाठ भरल्याचे दिसुन येते. मुबलक पाउस झाल्याने बहुतांश ठिकाणच्या ओढ्या काठी असणाऱ्या विहिरी पूर्ण क्षमतेने भरल्याचे पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)